Sunday , September 20 2026
Breaking News

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, ३५ आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ!

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २०-१०-१० असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते.

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाजपचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २० खाती राहण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना १०-१० खाती मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत झालेल्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील. नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला महसूल मिळू शकते. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खाते इतर गटाला सोपवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम स्वरूप मुंबईतील महायुतीच्या बैठकीनंतर मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी ही बैठक होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या अंतिम बैठकीनंतर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *