मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मिळालेल्या माहितीनुसार,आज महायुतीचे 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राधाकृष्णन विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे 19, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 10 मंत्र्यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मोठा थाटात हा सोहळा पार पडला.
महाराष्ट्रात तीन दशकांनंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी मुंबईऐवजी नागपुरात झाला. नागपुरात दुपारी ४ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्रात यापूर्वी १९९१ मध्ये नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यानंतर आता शपथविधी पार पडला.
महायुतीत असलेल्या पक्षांचे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. ज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 19, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 तर शिवसेना शिंदे गटाच्या 10 आमदारांचा समावेश आहे.
भाजपच्या कोट्यातून 19 मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे- कामठी-विदर्भ-ओबीसी
गिरीश महाजन- जामनेर- उत्तर महाराष्ट्र- गुर्जर ओबीसी
चंद्रकांत पाटील- कोथरूड-पश्चिम महाराष्ट्र- मराठा
जयकुमार रावल-धुळे शहादा- राजपूत
पंकजा मुंडे -MLC बीड-मराठवाडा- बंजारा समाज -OBC
पंकज भोयर- आरवी-विदर्भ- कुणबी मराठा
राधाकृष्ण विखे पाटील- शिर्डी- पश्चिम महाराष्ट्र- मराठा
मंगल प्रभात लोढा- मलबार हिल- मारवाडी
शिवेंद्रराजे भोसले- सातारा- पश्चिम महाराष्ट्र-मराठा
मेघना बोर्डीकर- जिंतूर-मराठवाडा- मराठा
नितेश राणे- कणकवली-कोकण – मराठा
माधुरी पिसाळ – पुणे – पश्चिम महाराष्ट्र – ओबीसी
गणेश नाईक- नवी मुंबई- ठाणे-ओबीसी
आशिष शेलार- मराठा- मुंबई वांद्रे
संजय सावकारे-भुसावळ-उत्तर महाराष्ट्र -SC
आकाश फुंडकर-विदर्भ- कुणबी मराठा ओबीसी
जयकुमार गोरे- मान खटाव- पश्चिम महाराष्ट्र माळी- ओबीसी
अतुल सावे- औरंगाबाद पूर्व-मराठवाडा -ओबीसी माळी
अशोक भुईके-विदर्भ आदिवासी
शिवसेनेचे 10 मंत्री
संजय सिरसाट-औरंगाबाद पश्चिम मराठवाडा- अनुसूचित जाती
उदय सामंत- रत्नागिरी-कोकण-कायस्थ ब्राह्मण
शंभूराजे देसाई- पाटण – पश्चिम महाराष्ट्र- मराठा
गुलाबराव पाटील -उत्तर महाराष्ट्र गुर्जर-ओबीसी
भरत गोगावले- महाड – कोकण – ओबीसी मराठा कुणबी
संजय राठोड – डिग्रस-विदर्भ – ओबीसी बंजारा
आशिष जैस्वाल- रामटेक -विदर्भ – ओबीसी बनिया
प्रताप सरनाईक-ठाणे- माजिवडा – मराठा
योगेश कदम-दापोली-कोकण – मराठा
प्रकाश आबिटकर- राधानगरी-पश्चिम महाराष्ट्र- मराठा
राष्ट्रवादीचे 10 मंत्री
अदिती तटकरे-श्रीवर्धन-कोकण – ओबीसी
नरहरी झिरवाळ- दिंडोरी-उत्तर महाराष्ट्र -आदिवासी समाज
बाबासाहेब पाटील- अहमदपूर – मराठवाडा- मराठा
हसन मुश्रीफ-कागल- पश्चिम महाराष्ट्र – मुस्लिम अल्पसंख्याक मुस्लिम चेहरा
दत्ता भरणे – इंदापूर- पश्चिम महाराष्ट्र – धनगर समाज
धनंजय मुंडे – परळी- मराठवाडा -बंजारा ओबीसी
अनिल पाटील- अमळनेर-उत्तर महाराष्ट्र – मराठा
मकरंद पाटील – सातारा – पश्चिम महाराष्ट्र – मराठा
माणिकराव कोकाटे- सिन्नर-उत्तर महाराष्ट्र – मराठा