बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल गुरुवारी विधान परिषद सदस्य यांनी विधानपरिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चाहते नाराज झाले असून सी. टी. रवी यांच्या राजीनामीच्या मागणी करत उद्या शनिवारी बेळगावात आंदोलन करून निदर्शने करण्यात येणार आहेत.
एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी विविध संघटनांच्या नेत्यांची बैठक होऊन उद्याच्या आंदोलनाचा निर्णय घेतला.
उद्या सकाळी 11 वाजता सीपीडी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.