बेळगाव : “स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कतृत्व आणि स्त्री म्हणजे नेतृत्व असते ज्या घरातील स्त्री सुरक्षित असते ते कुटूंब संस्कारात असते, एका स्त्रीने शिक्षण घेणं म्हणजे एका घरांने पर्यायाने एका कुटुंबाने शिक्षण घेऊन संस्कारात होणे असा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात स्त्री भाग्यविधाता स्थानी आहे, तिच्या पंखात बळं भरणं आम्हा सर्वांचं कर्तव्य असून आजच्या स्त्रीचा आवाज बुलंद आहे त्या आवाजात उत्तम नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या खानापूर तालुक्यातील अनेक महिला आहेत याचा मला एक लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान आहे”, असे प्रतिपादन खानापूरचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठल हलगेकर यांनी मराठा मंडळ ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयाच्या स्नेहमेळाव्यात काढले.
शिक्षण संपल्यावरही विद्यार्थ्यिनींना शाळेनं सन्मानानं साद घालावा आणि विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशीच अनुभूती येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात शनिवारी आली. मराठा मंडळाचे तात्कालिन अध्यक्ष कै. नाथाजीराव हलगेकर यांनी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी १९९४ साली ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय या दालनांची स्वतंत्रपणे निर्मित केली होती. आजवर हजारो विद्यार्थिनींनी येथून शिक्षण घेवून कर्तृत्वाची विविध क्षेत्रं गाजवली आहेत. मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डाॅक्टर राजश्रीताई नागराजू यांनी अशा सर्व विद्यार्थिनींना पुन्हा एकत्र करून शिक्षणाचा, पर्यायाने शिक्षकांचा आणि विद्यार्थिनींचा सन्मान वाढविण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
म्हणून काॅलेजच्या या विद्यार्थिनीना एकत्र येण्याची अभूतपूर्व संधी प्राप्त झाली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी भूषविले होते. कार्यक्रमाला दिपप्रज्वलक म्हणून खानापूर तालुक्याचे जनप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते. काॅलेजच्या प्रार्थना गीताने आरंभ झाला, काॅलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत प्रास्ताविक केले. या प्रसंगी ज्येष्ठ संचालक श्री. परशराम गुरव, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती दया वांगणेकर, प्रमुख वक्ते श्री मायाप्पा पाटील, ए पी एम सी व्यापारी चेतन पाटील, लहान कंग्राळीचे ग्रामपंचायत अध्यक्ष कल्लाप्पा पाटील, अभियंता सिध्देश मुचंडीकर, मुख्याध्यापक राहूल जाधव, बनोशी, माजी विद्यार्थी प्रतिनिधी शरयू कदम, शामल पाटील व ज्येष्ठ प्राध्यापक एन. ए. पाटील उपस्थित होते.
दिप प्रज्वलन व ताराराणी प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी विद्यार्थिनींनी स्वागत गीत व ईशस्तवन गीत सादर केले याच बरोबर डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या बहारदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आता काॅलेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनीनी दिली. याप्रसंगी आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांनी ताराराणीच्या कब्बडी व खो खो क्रिंडागणासाठी रूपये पाच लाख देणगी जाहीर केली. त्याच बरोबर श्री. चेतन पाटील यांनी मराठा मंडळाच्या क्रीडा संकुलासाठी रूपये पंचवीस हजार तसेच श्री. सिध्देश मुचंडीकर व अनुजा गिरी यानीही अनुक्रमे रूपये पाच हजाराची देणगी जाहीर केली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अभियंता श्री. गोपाळराव कुकडोळकर, भाजी मार्केट व्यापारी पदाधिकारी श्री. महेश चव्हाण, डाॅक्टर संतोष पाटील, एल आय सी पदाधिकारी श्री. लक्ष्मणराव पाटील यांनी ठेवलेल्या हजारो रूपयाच्या रोख रक्कमेच्या पुरस्कारांचे वितरण काॅलेमध्ये बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यिंनीना करण्यात आले. माजी विद्यार्थिनींकडून काॅलेजच्या आजी माजी प्राध्यापक व कर्मचारींचा सन्मान शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक म्हणून प्रा. टी आर जाधव व
वैशाली पाटील यांनी केले. या स्नेहमेळाव्याला काॅलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, बेंगळोर अशा लांब लांब ठिकाणाहून बहुसंख्येने उपस्थित होत्या स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा मनिषा यलजी, नृत्य मार्गदर्शक मानसी पाटील, प्रा. पुंडलिक कर्लेकर, प्रा. मरीत्तमन्नावर, प्रा. मंगल देसाई, प्रा. अरती नाईक, प्रा. ऋतू पाटील, प्रा. सोनल पाटील, प्रा. दिपाली निडगलकर, प्रा. सुनिता कणबरकर, प्रा. जयश्री शिवठणकर, प्रा. एन. एम. सनदी यांनी विशेष परिश्रम घेतले.