मुडलगी : शेतात पाणी सोडण्यावरून तिघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन खून झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील पुलगड्डी गावात सोमवारी घडली. रामाप्पा बसवंतप्पा कौजलगी (२५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सिद्धप्पा मल्लाप्पा कौजलगी (२४) हा खुनाचा आरोपी आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी रामप्पा त्याचे वडील बसवंतप्पा शेतात पाणी घालत होते. त्यातच सिद्धप्पा याच्याबरोबर पिता पुत्राचे पाण्यासाठी भांडण झाले आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले आणि सिद्धप्पाने रामप्पाला आपल्या हातातील काठीने मारहाण केली असता रामप्पा गंभीर जखमी झाला. उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. रामप्पपाचे वडील बसवंतप्पा गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोकाक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डीवायएसपी डी. मुल्ला, सीपीआय श्रीशैल ब्याकोड, पीएसआय राजू पुजेरी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा नोंदवून तपास केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.