बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील बेनकोळी गावाजवळ घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
हुक्केरी तालुक्यातील दड्डी गावातील किरण नावाच्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मारुती इक्कोने किरण प्रवास करत असताना कार घटप्रभा नदीत कोसळली.
यमकनममर्डीहून बेळगावच्या दिशेने जात असताना कार नदीच्या पाण्यात पडली. कारमध्ये अडकून किरणचा मृत्यू झाल्याचे कळते. ही कार मंगळवारी सायंकाळी किंवा रात्री पडल्याचे सांगण्यात येत आहे. यमकनमर्डी पोलीस घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत.