Saturday , January 11 2025
Breaking News

युवा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहा; चलवेनट्टी भागात जागृती सभा

Spread the love

 

 

बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका आघाडीतर्फे येत्या 12 जानेवारी रोजी जागतिक युवा दिनानिमित्त युवा मेळावा आयोजित केलेला आहे,
महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या या मेळाव्याला चलवेनट्टी व इतर भागातील युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आज करण्यात आले.

चलवेनट्टी गावात एक जागृती सभा घेण्यात आली या जागृती सभेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवा मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व हा मेळावा यशस्वी करावा, तसेच 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून हुतात्म्यांना अभिवादन करावे व मध्यवर्ती महाराष्ट्र समितीने “चलो कोल्हापूर”चा नारा दिलेला आहे. त्या “चलो कोल्हापूर”च्या सभेला प्रतिसाद देत आपण बहुसंख्येने कोल्हापूरला उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले.

गावातील युवा कार्यकर्ते भूषण पाटील यांनी आम्ही कायमच युवक समितीच्या प्रत्येक लढ्यात सक्रिय सहभागी असून या भागातील ही मराठी माणूस अजूनही मराठी निष्ठा कायम टिकवून आहे. आम्ही युवकही सदैव समितीच्या पाठीशी आहोत व येत्या 12 जानेवारी होणाऱ्या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहुन हा मेळावा यशस्वी करून दाखवू असे आश्वासन दिले.

या जागृती सभेला अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी संबोधित केले.तसेच सभेला उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, चिटणीस सचिन दळवी, मारुती पाटील, मोहन अमृत रेडेकर, नितेश नाथबुवा, दिपक बडवानाचे महादेव पाटील, किरण पाटील, अमर नाथबुवा सचिन हुंदरे, ओमकार पाटील, यश पाटील, देवाप्पा पाटील, सचिन पाटील, सुशांत पाटील, यल्लाप्पा सातेरी पाटील, इंद्रजीत कलखांबकर, विनायक उच्चुकर, राजू पाटील, इराप्पा घसारी,शिवाजी हुंदरे, ओमकार बाळू पाटील, यल्लाप्पा पाटील, राम करीबाळे ओम पाटील साई पाटील, भरमा पाटील, अतिष पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला : सुदैवाने जीवितहानी नाही

Spread the love  हारुगेरी : उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना रायबाग तालुक्यातील हारुगेरी शहरात शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *