आणंद : गुजरातमधील आणंद जिल्ह्यात बुधवारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील तारापूरजवळ एक ट्रक आणि कारची धडक झाली. यामध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. तर जखमींना तारापूर रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही धडक एवढी जोरात होती की, या अपघातात कारचा जागीच चुरडा झाला. या कारमध्ये एकाच कुटुंबातील लोक प्रवास करत होते. या अपघातात संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडले असून दोन महिला, सात पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. सुरतमधून भवनगरला जात असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, पोलीस अधिक तपास करीत आहेत.