तेऊरवाडी (एस.के. पाटील) : माणगाव फाटा (ता. चंदगड) येथे दुचाकी घसरून रस्त्याशेजारी कापून ठेवलेल्या ओंडक्यावर आदळल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत शाम तंगणकर (वय ३१, रा. तुरमुरी, ता. बेळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ९.१० वाजता हा अपघात घडला. संकेत हा विजयनगर (बेळगाव) येथे पाळीव प्राण्याच्या खाद्याचे दुकान चालवीत होता. कामानिमित्त तो चंदगडला गेला होता. अपघातात संकेतच्या डोकीला मार लागल्याने जागीच ठार झाला. मारुती तंगणकर यांनी चंदगड पोलिसांत वर्दी दिली. निवृत्त शिक्षक शाम तंगणकर यांचा तो मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …