Tuesday , September 17 2024
Breaking News

पशु रुग्णवाहिकेसाठी मदतीचे आवाहन

Spread the love

बेळगाव : बेळगाव पशु कल्याण संघटनेने बेळगावातील पहिली पशुरुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आपल्या पाळीव प्राण्यांचे भरपूर लाड करत असतो, तो प्राणी नकळत आपल्या कुटुंबाचा सदस्यच बनतो. परंतु तो प्राणी जर आजारी पडला किंवा त्या प्राण्याला काही झालेच तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण प्राण्यांसाठी 108 रुग्णवाहिका चालत नाही. परंतु त्या प्राण्यांना ही वैद्यकीय सेवेची गरज असते. हे लक्ष्यात घेऊन बेळगाव येथील पशु कल्याण संस्थेमार्फत (बावा) बेळगाव येथे पहिली पशुरुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी जमा केला जात असून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. बावा ही संघटना एक पशुप्रेमी संघटना म्हणून बेळगाव शहरात परिचित आहे. संकटात अडकलेल्या मुक्या जनावरांना जीवदान देण्याचे काम ही संघटना नेहमीच करत असते. हे कार्य करत असताना या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जसे की एखाद्या प्राण्याला गंभीर दुखापत झाली तर त्या प्राण्याला पशुवैद्यकीय तज्ञापर्यंत घेऊन जाण्यात अनेक अडचणी येत असतात अश्या वेळी पशु रुग्णवाहिका उपयोगी पडणार आहे. त्यासाठी बावा ही संस्था प्राण्यांसाठी विशेष रुग्णवाहिका सुरु करणार आहे. आजारी किंवा अपघातग्रस्त प्राण्यांना वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, प्राण्यांना ऑक्सिजन तसेच इतर सोई पुरविण्यासाठी किंवा जखमी प्राण्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी ही रुग्णवाहिका उपयोगी ठरणार आहे.
सदर रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर्स, प्राण्यांचे ऑक्सिजन मास्क, प्राण्यांचे स्ट्रेचर, प्रथमोपचार किट इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध असणार आहेत. पशुरुग्णवाहिकेच्या माध्यमातून बावा या प्राणिप्रेमी संघटनेने शहर परिसरातील पाळीव तसेच भटक्या प्राण्यांसाठी 24 तास सेवा देण्याचा संकल्प केला आहे. सदर रुग्णवाहिकेसाठी निधी जमा करण्यात येत आहे यासाठी ज्यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी तसेच अधिक माहिती किंवा सूचनासाठी helplinebawa@gmail. com या ई-मेलवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *