साहित्य संमेलन हे उपेक्षितांना जगण्याचं बळ देतं
– संमेलनाध्यक्ष अमोल बागुल
शरद गोरे यांचे कार्य प्रेरणादायी असून साहित्य क्षेत्रातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदार पद मिळालं पाहिजे
– महादेव जानकर
सीमाभागात मराठीची गळचेपी थांबवावी – सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले.
पुणे (रवी पाटील) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 3 रे अखिल भारतीय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्य ऑनलाईन संमेलन 4 जुलै 2021 सकाळी ठीक 11वाजता साहित्यिक अमोल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
साहित्य संमेलन ही वैचारीक बैठक असुन समाजमना उभारी देणारी असतात. साहित्य संमेलन हे उपेक्षितांना जगण्याचं बळ देत असे विचार संमेलनाध्यक्ष अमोल बागुल यांनी मांडले.
यावेळी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे स्वागताध्यक्ष म्हणून स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्शवादी युग पुरुष असुन सामाजिक विषमतेची तौलनिक वैचारिक मांडणी विशद केली.
उपेक्षित वंचिताना हक्क साहित्यांतून मांडून न्याय मिळेल. तसेच परिषदेच्या माध्यमातून शरद गोरे यांचे कार्य प्रेरणादायी असून साहित्य कोट्यातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदार पद मिळालं पाहिजे असे प्रतिपादन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
साहित्य संमेलनातून सामाजिक समता, बधुता व न्याय मिळावा, विषमतेचे दरी नष्ट व्हावी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे मत उदघाटक नात्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काढले.
बेळगाव सीमाभागात मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी चळवळ म्हणून साहित्य संमेलने भरविण्यात येतात. मराठी माणसाच्या व्यथा वेदनांचा हुकार मांडण्याचे विचारपीठ म्हणजे साहित्य संमेलन आहेत. सीमाभागात मराठीची गळचेपी थांबवावी असे प्रतिपादन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले
यावेळी परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील, विदर्भ अध्यक्ष आनंद शेंडे, सुवर्णा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन मुंबई प्रदेश अध्यक्ष राजश्री बोहरा यांनी केले.
या कवी संमेलनात चाळीस हून आधिक कवींनी सहभाग घेतला. सुत्रसंचालन अनिता गुजर यांनी केले.