बेळगाव : वडगाव परिसरात सापडलेल्या निराधार गतिमंद महिलेची मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांच्या पुढाकारातून जुने बेळगाव येथील निराधार केंद्रात रवानगी करण्यात आली. गेल्या वीस दिवसांपासून मंगाई मंदिर वडगाव या परिसरात यल्लूबाई दंडगल नावाची गतिमंद महिला फिरत होती. मंगाईदेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते युवराज पाटील व योगेश पाटील यांनी तिची विचारपूस केली पण ती योग्य उत्तर देत नसल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधला. माधुरी जाधव यांनी त्या महिलेची चौकशी केली असता ती अनगोळ येथील झटपट कॉलनी येथे राहत असल्याचे स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतल्यानंतर तिच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची असून तिची लहान बहीणही अविवाहित आहे. तिच्या कुटुंबियांनी यल्लूबाई हिची कोणत्याही आश्रमात राहण्याची सोय करण्याची विनंती केली.
जुने बेळगाव येथील महानगरपालिका निराधार केंद्रामध्ये तिची राहण्याची सोय करण्यात आली. यावेळी राहुल तळेकर, राजेश पाटील, अश्विन चव्हाण, जुनेद आसिफ व संकेत धामणेकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta