बेळगाव : स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळामध्ये जनतेची उत्तम सेवा केल्याबद्दल कोरोना फ्रंट लाईन वारीयर्स ठरलेल्या अंगणवाडीच्या महिला शिक्षकांचा सत्कार करत महिला शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य अँजेल फाऊंडेशन केला आहे.
बेळगावमधील रामनगर आणि विजयनगर भागातल्या अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी अँजेल फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना अनिल बेनके, सचिव मिलन पवार आणि प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक संतोष पेडणेकर, प्रज्ञा शिंदे, कांचन कोपर्डे या उपस्थित होत्या.
अंगणवाडी शिक्षकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळामध्ये जनतेची सेवा बजावली होती याबाबत महिला शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अँजेल फाऊंडेशनच्यावतीने या महिलांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार करणार असल्याचे मीना बेनके यांनी सांगितले. यावेळी शेकडो अंगणवाडी शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
