बेळगाव (वार्ता) : सौंदत्ती विभागाच्या वनक्षेत्रपाल म्हणून सेवा बजावणाऱ्या आएफओ सुनीता एम. निंबरगी यांना साहाय्यक अधिकारीपदी (एसीएफ) बढती मिळाली आहे. सुनिता निंबरगी यांनी यापूर्वी बेळगाव वन विभागात यशस्वीरित्या सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवेचा सुनीता निंबरगी विचार करून त्यांना बढती देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी आहेत. सौंदत्ती येथील आएफओ यांना राज्य सरकारच्या वन विभागाच्यावतीने देण्यात येणारे मुख्यमंत्री सुवर्णपदक जाहीर झाले होते. श्रीमती निंबरगी या पदक मिळविणाऱ्या पहिल्या महिला वनक्षेत्रपाल ठरल्या होत्या. त्यांनी वनखात्यात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. वन संवर्धन व वन्यप्राण्यांचे रक्षण तसेच तस्करी, अतिक्रमणसह चोरीच्या घटना रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली.
वन्य प्राण्यांविषयी देखील जंगल परिसरात राहणाऱ्या जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. अनेक जनजागृतीपर कार्यक्रम देखील त्यांनी राबवले आहेत. वन संवर्धन व प्राणी संरक्षणात त्यांचे मोलाचे योगदान असून याबाबत त्यांनी व्यापक जागृती कार्यक्रम राबविले आहेत. याची दखल घेत कर्नाटक राज्य शासनाने त्यांना पुरस्कार घोषित केला आहे. 23 मार्च रोजी वनक्षेत्रपाल निंबरगी यांना बेंगळूर येथे पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
Check Also
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 …