Saturday , December 14 2024
Breaking News

शरद पवार यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा बेळगावात सर्वपक्षीयांकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा ठराव झाला.

शरद पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. याचा निषेध करण्यासाठी शनिवारी जत्तीमठ येथे बैठक झाली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी शरद पवार यांचे देशाच्या राजकारणात मोठे स्थान आहे. महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करीत असून पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये मोठ्या राजकीय शक्तीचा हात असून ऍड. सदानंद गुणवर्ते यांनी मराठा आरक्षणला देखील खो घालण्याचा प्रयत्न केला होता.

पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकार किंवा पंतप्रधान यांनी याबाबत निषेध नोंदविला नाही त्यामुळे केंद्र सरकारचा देखील निषेध करणे गरजेचे आहे. देशात लोकशाही टिकवायची असेल तर अशा घटनांचा जाहीर निषेध करणे गरजेचे असून पंतप्रधान केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली.

दत्ता जाधव यांनी महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी ईडीचा वापर केला जात असून पवार यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा सीमावाशीयांवर झालेला हल्ला असून शिवसेनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करीत आहे असे मत व्यक्त व्यक्त केले.

अमोल देसाई, के. जी. पाटील, महादेव पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, अमित देसाई, चंद्रकांत कोंडूसकर, ऍड. एम. जी. पाटील, दुर्गेश मेत्री, मोतेश बारदेशकर, अहमद रेशमी, राजू मरवे, रूपा देसाई, दत्ता उघाडे आदींनी पवारांच्या घरावरील हल्ल्याचा जाहीर निषेध केला.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा पुसण्याचा प्रयत्न आहे.शाहू फुले आंबेडकर, यशवंतराव वसंत दादा पाटील, यांनी महाराष्ट्राचा आदर्शवत असा पुरोगामी विचार सरनीचा चेहरा तयार तो काही जातीयवादी शक्तींना अडचणीचा वाटू लागल्याने गुणरत्न सदावर्ते सारख्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला हाताशी धरून अश्या पद्धतीच्या हल्ल्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असे गुणवंत पाटील यांनी सांगितले.

विकास कलघटगी, तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, किरण हुद्दार, बंडू केरवाडकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!

Spread the love  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *