बेळगाव : श्री भगवान महावीर स्वामींच्या 2621व्या जन्म कल्याण महोत्सवानिमित्त आज गुरुवारी बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. शोभायात्रेत भगवान महावीरांच्या जीवन कार्य आणि संदेशांवर आधारित आकर्षक चाळीस चित्ररथांसह 100 बुलेट स्वार युवक-युवती सहभागी झाले आहेत.
बेळगावात गेल्या 23 वर्षांपासून श्री भगवान महावीर जन्म कल्याण सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष जन्म कल्याण सोहळा साजरा झाला नाही. दरम्यान यावर्षी जन्म कल्याण महोत्सवानिमित्त तीन एप्रिलपासून विविध सामाजिक संस्कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी येथील संयुक्त महाराष्ट्र चौक येथून भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
संयुक्त महाराष्ट्र चौक येथून सुरू झालेली शोभायात्रा शहर उपनगरातील विविध मार्गांवर फिरून हिंदवाडी महावीर भवन येथे शोभायात्रेची सांगता होणार आहे. शोभायात्रेत यावर्षी प्रथमच शंभर बुलेट स्वार युवक-युवती सहभागी झाले आहेत. 40 चित्ररथ शोभायात्रेचे आकर्षण ठरले आहेत. शोभायात्रेच्या सांगते नंतर महावीर भवन येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पंचवीस ते तीस हजार लोकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …