बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर
बेळगाव (वार्ता) : वीजबिलाचे कानडीकरण थांबविण्याबाबत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून हेस्कॉमचे मुख्य अभियंते श्री. पी. जी. नागराज यांना निवेदन देण्यात आले.
नमूद विषयाप्रमाणे बेळगावला वीज पुरवठा करणार्या आपल्या हेस्कॉम कंपनीची विजबिले ही या महिन्यापासून फक्त कन्नड भाषेत दिली जात आहेत, काही वर्षांपूर्वी ही विजबिले तिन्ही भाषेत म्हणजे मराठी, कन्नड, इंग्रजीत दिली जात होती, जेव्हापासून संगणिकृत बिले देण्यात येऊ लागली. तेव्हा सर्वांच्या सोयीसाठी इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला. पण या महिन्यापासून विद्युत्त बिले फक्त कन्नड भाषेत दिली जात आहेत. बेळगावसह सीमाभागात बहुसंख्य मराठी भाषिक असल्याने ही कन्नड भाषा सक्ती बंद करत ही विजबिले मराठी भाषेत सुद्धा देण्यात यावीत. संविधानातील कलम 29 भाषिक अल्पसंख्याकांना त्यांची मातृभाषा, लिपी संरक्षित करण्याचा अधिकार आहे, आणि अश्या प्रकारे मराठी भाषिक ग्राहकांना फक्त कन्नड भाषेत बिले देणे म्हणजे त्यांच्या भाषिक अधिकाराचे हनन आहे.
त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालाय धारवाड खंडपीठाने दि. 18 नोव्हेंबर 2013 रोजी दिलेल्या निकालात (WRIT PETITION No.79953/2013LB-RES) मराठी भाषिकांना सर्व कागदपत्रे तसेच भाषिक अधिकार द्यावेत नमूद केले आहे, आणि हेस्कॉमचे असे वागणे म्हणजे भाषिक अधिकारांची पायमल्ली आहे.
विजबिलाबाबतची भाषिक सक्ती दूर करावी नाहीतर याबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिला.
याबाबत लवकरच लक्ष घालण्यात येईल असे आश्वासन श्री. नागराज यांनी दिले.
निवेदन देतेवेळी बेळगाव युवा समिती कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, पदाधिकारी वासू सामजी, बाबू पावशे, संतोष कृष्णाचे, विनायक कावळे, सुधीर शिरोळे आदी उपस्थित होते.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …