बेळगाव : भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने संजीवनी फाऊंडेशन वृद्धाश्रमात एकत्रपणे साजरा करण्यात आला. डॉक्टर अनिल पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य योध्यांबद्दल आदर व्यक्त करून त्यांना अभिवादन केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
दयानंद चौगुले यांनी संजीवनी फाऊंडेशनला पाच हजार रुपयांची देणगी दिली.
यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनच्या सचिव आरती निपाणीकर, अमित पाटील, संजीवनी पाटील, मनाली पोटे, कोमल टेगिंनकर व इतर अनेक जण उपस्थित होते.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …