बेळगाव : मान्सूनची चाहूल लागताच येळ्ळूरमधील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. येळ्ळूरच्या पश्चिम भागाला 15 मे पासून पेरणीला सुरुवात होत असते. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पेरणी लांबली होती. दरवर्षी धुळवाफ पेरणी होत होती. पण यावर्षी जमीन ओली असल्यामुळे पेरणी थोडी उशिरा चालू झाली आहे. बाकी शेतातील अजून बरीचशी कामे पावसामुळे शिल्लक आहेत. तरी जुन संपायच्या आधी 90% पेरणी पूर्ण होईल. येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta