Wednesday , May 29 2024
Breaking News

जायंट्स सखीतर्फे मळेकरणीदेवी मंदिर परिसरात डस्टबीनचे वितरण

Spread the love

बेळगाव : उचगाव येथील जागृत मळेकरणीदेवीची दर मंगळवारी आणि शुक्रवारी यात्रा भरत असते. या यात्रेदरम्यान हजारो भाविक याठिकाणी भेट देत असतात. यावेळी प्रासादिक भोजन होत असते. पण स्वच्छतेच्या बाबतीत भाविकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे,
आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी असते, त्याचा व्यवस्थित निचरा होणे गरजेचे असते पण मंदिर परिसर हा पूर्णपणे अस्वच्छ झालेला पहावयास मिळतो जिकडे तिकडे पत्रावळ्या पडलेल्या असतात त्यात भरीस भर म्हणजे प्लॅस्टिकच्या ग्लास आणि वाट्यांचा वारेमाप वापर,
या सगळ्याचा विचार करून जायंट्स सखीने मंदिर परिसरात ठेवण्यासाठी चार मोठ्ठे डस्टबीन भेट म्हणून दिले. मळेकरणी देवस्थान कमिटीच्या सदस्या आणि माजी ग्रामपंचायत अध्यक्षा योगिता देसाई यांच्याकडे डस्टबीन सोपविण्यात आले.

यावेळी जायंट्स सखीच्या वतीने देवस्थान समितीला आवाहन करण्यात आले की इथे येणाऱ्या भाविकांना आपण प्लॅस्टिक ग्लास, वाट्या वापरण्यावर बंदी आणावी जेणेकरून इथे कचरा तर कमी होईलच पण त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल. नैसर्गिकरित्या प्लॅस्टिक कुजण्यास एक हजार वर्षापेक्षा जास्त वेळ लागत असून हे प्लॅस्टिक मातीत साठून राहिल्याने भविष्यात नागरिकांना अन्न आणि पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी नियम भरपूर आहेत; पण त्याची अंमलबजावणी करायला कोणाला वेळ मिळालेला दिसत नाही असे सखीच्या वतीने ज्योती अनगोळकर यांनी सांगितले.
या आवाहनाला प्रतिसाद देत योगिता देसाई यांनी आपण देवस्थान समितीच्या माध्यमातून नक्कीच यावर विचार करू असे सांगितले. यावेळी अध्यक्षा चंद्रा चोपडे, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, अपर्णा पाटील, संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, ज्योती सांगुकर, वैशाली भातकांडे, शितल पाटील उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदेशीरपणे देणग्या (डोनेशन) स्वीकारल्यास शाळांची नोंदणी रद्द : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा इशारा

Spread the love  बेळगाव : जिल्ह्यातील विनाअनुदानित किंवा अनुदानित शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची देणगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *