बेळगाव : कॅण्टोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीतील बीफ, मटण आणि पोर्क मार्केटमधील स्टॉल भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित केला आहे. एक वर्षाच्या मुदतीसाठी हा लिलाव असून २० जून रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. थकबाकीदारांना लिलावात सहभागी होता येणार नाही. स्टॉल्स हस्तांतरित केल्यापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिले जातील. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आधार कार्ड/निवासी पुरावा आणि ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सुरक्षा ठेव प्रत्येक स्टॉलसाठी देऊ केलेल्या सर्वोच्च बोलीच्या मासिक शुल्काच्या तीनपट असेल.
लिलावावेळी कोणतीही बोलणी होणार नाही. जर बोर्ड बोलीवर समाधानी नसेल तर कोणतेही कारण न देता पुन्हा लिलाव केला जाईल. बीफ मार्केट मार्केटमधील १८ स्टॉलसाठी मूळ बोली २००० रुपये व ईएमडी ४ हजार, मटण मार्केटमधील १० स्टॉलसाठी मूळ बोली १,५०० रुपये व ईएमडी ३ हजार तर पोर्ट मार्केट १ स्टॉलसाठी मूळ बोली ३,५०० रुपये व ईएमडी ७ हजार रुपये असेल. याचबरोबर २०२२-२३ या वर्षासाठी कॅण्टोन्मेंटमध्ये कोणताही व्यापार, व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना व्यापार परवाना आवश्यक आहे. यासाठी जाहिर नोटीस देण्यात आली आहे. इच्छुकांनी ई-छावणी पोर्टलवर १५० रुपये भरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. त्यानंतर व्यापार परवाना दिला जाईल. व्यापार परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्यांवर कॅण्टोन्मेंट कायद्यानुसार पाच हजार रुपये दंड आकारला जाईल.
Check Also
सुवर्णलक्ष्मी सोसायटीस अभिनेते प्रसाद पंडित यांची सदिच्छा भेट
Spread the love बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, …