बेळगाव : कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा कर्नाटक बिझनेस अवॉर्ड बेळगाव येथील प्रतिक टूर्सचे संचालक प्रतिक प्रेमानंद गुरव यांना आज प्रदान करण्यात आला.
कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज बेंगळूर येथील मन्फो कन्व्हेशन सेंटर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट ग्राहकसेवा देऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी प्रतिक गुरव यांची निवड करण्यात आली होती. टूरिझम क्षेत्रात सेवा देणाऱ्या यशस्वी उद्योजक श्रेणीत संपूर्ण कर्नाटकातून प्रतिक गुरव यांना निवडण्यात आले. याचबरोबरीने बँकिंग, सहकार, कॉर्पोरेट, सामाजिक सेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध मान्यवरांनी या सोहळ्यात गौरविण्यात आले.
माजी आयपीएस अधिकारी आणि आपचे नेते भास्कर राव, केजीएफ फेम अभिनेता यश, तरुण आणि तडफदार खासदार तेजस्वी सुर्या तसेच इतर अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती.
Belgaum Varta Belgaum Varta