बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या रिक्त संचालक पदासाठी उद्या चुरशीची निवडणूक होणार आहे.
कुडचीचे प्रमोद पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदासाठी सहकार खात्यातर्फे निवडणूक घेण्यात येणार आहे. यावेळी बेळगाव ग्रामीण मधील पश्चिम बेळगावमधून मराठा समाजासाठी कार्य करणारे किणये गावचे हेमंत पाटील व यमकनमर्डी हांदिगनूरमधून दयानंद पाटील उभे राहणार आहेत.
त्यामुळे सहकार क्षेत्रात संचालकपदी होणारी ही निवडणूक चूरशीची होणार आहे. तसेच या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे उद्याचे निवडणूकीनंतर समजणार आहे.