बेळगाव : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून साजरी न झालेली शनेश्वर जयंती यंदा सोमवार दि. 30 मे रोजी उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त चौधरी प्यालेस, पाटील गल्ली येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला अनेक रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात के एल ई इस्पितळाचे डॉ. संतोष हजारे, डॉ. विठ्ठल माने, डॉ. श्रीकांत वीरगी, डॉ. श्रीपाद एल श्रीकांत आदीनी दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
के एल ई रक्तपेढीच्या वतीने रक्त जमा करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष संजय शहा, सचिव श्रीकांत देसाई, अनिल चौधरी, रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील, संजय भावी, शिवापा ईटगी, परशराम माळी, नितीन कपलेश्वरकर, अमर चौगुले आदींनी उपस्थित राहून या शिबिरात भाग घेतला.
5 जून रोजी महाप्रसाद
शनेश्वर जयंतीच्या निमित्ताने शनिवार दि. 5 जून रोजी दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन शनेश्वर एज्युकेशन आणि सोशल वेल्फेअर सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.