बेळगाव : अथणी येथील रेणुका शुगर्सच्या युनिट ४ मधून दूषित पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. हे पाणी आसपास परिसरात तसेच कालव्यांमध्ये मिसळत असल्याने या परिसरातील जनावरे आणि मासे दगावले आहेत. याविरोधात आज कोकटनूर येथील ग्रामस्थांनी बेळगावमध्ये आंदोलन छेदत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अथणी तालुक्यातील कोकटनूरसह आसपास परिसरात असणाऱ्या चार ते पाच गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे. अथणी येथील रेणुका शुगर्सच्या युनिट ४ मधून दूषित पाणी बाहेरील परिसरात सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे अनेक जनावरे तसेच मासे दगावले असून रेणुका शुगर्सच्या दूषित पाण्यामुळे अनेक समस्या देखी उद्भवल्या आहेत. याला विरोध करत संतप्त नागरिकांनी बेळगावमध्ये आंदोलन छेदत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार टोपण्णावर बोलताना म्हणाले, इतक्या असुविधा असूनही या परिसरात कोणीही डोकावून पहिले नाही. या परिसरातील लोकप्रतिनिधी डोळे मिटून गप्प बसले असून तातडीने रेणुका शुगर्स विरोधात कारवाई करावी, असा आग्रह त्यांनी केला.
याचवेळी आंदोलकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, रेणुका शुगर्समधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे पिकांचे, जनावरांचे नुकसान होत आहे. अनेक समस्या उद्भवत आहेत. अनेक जनावरे आणि मासे मृत्युमुखी पडले आहेत. दहा दिवसाच्या आत या कारखान्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.