बेळगाव : संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल गणेशपूर बेळगाव येथे बुधवारी विद्यारंभ होम आणि हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग पारंपरिक वेशभूषेत हजर होते. विद्यार्थ्यांनी आलेल्या अतिथीचे स्वागत केले व मुलींनी हळदी कुंकू व वाण देऊन आलेल्या महिला वर्गाचे स्वागत केले. गणहोम शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. डॉ. विजय गोवेकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे पौरोहित्य कार्तिक जोशी आणि ओमकार कुलकर्णी यांनी केले. शंकर पाटील यांच्या भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला जन कल्याण ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. भालचंद्र गाडगीळ, सदस्य देशपांडे सर, मधुकर गर्लहोसुर, लक्ष्मणराव पवार, अशोक शिंत्रे, माजी आमदार संजय पाटील, आमदार अनिल बेनके, किरण जाधव, शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग, पालक व परिसरातील सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta