बेळगाव : येळ्ळूर रोड अन्नपूर्णेश्वरी येथील अन्नपूर्णेश्वरी देवीचा वार्षिकोत्सव आजपासून सुरू झाला आहे. त्यानिमित्त मंदिरात सकाळपासून गणहोम, नवग्रह होम, वास्तु होम, सुदर्शन होम प्रार्थना करण्यात आली. तसेच उद्या शनिवार दिनांक 4 जून रोजी अभिषेक महा चंडिका हो देवीचा पालखी महोत्सव व दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. तसेच रविवार दिनांक 5 रोजी देवीचा विशेष अलंकार पूजा होऊन महाप्रसादाने या वार्षिकोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे.
सदर अन्नपूर्णेश्वरी देवीचा वार्षिकोत्सव सलग तीन दिवस चालणार असून देवीच्या वार्षिक उत्सव व कार्यक्रमाला वडगाव भागातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर ट्रस्टचे सचिव श्रावण कुमार हेगडे यांनी केले आहे.
