बेळगाव : नेताजी गल्ली, होनगा येथील ॲड. नितीन आनंदाचे लिखित ‘माझी चारधाम यात्रा’ या प्रवास वर्णन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवार दि. 5 जून 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतन सभागृहामध्ये जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमन ॲड. अश्विनी बिडीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जी.एस.एस. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे व सावंतवाडीचे निवृत्त प्राचार्य -साहित्यिक प्रा. भाऊराव कातकर हे उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून तुकाराम को -ऑप. बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, दि. पायनियर अर्बन बँक लि.चे चेअरमन प्रदीप अष्टेकर, मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे चेअरमन दिगंबर पवार आणि मराठा बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर हजर राहणार आहेत.
तरी साहित्यप्रेमींसह नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन लेखक ॲड. नितीन आनंदाचे यांनी केले आहे.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …