Wednesday , July 24 2024
Breaking News

सायकलिंग मोहिमेद्वारे जागतिक सायकल दिन साजरा

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरातील वेणूग्राम सायकलिंग क्लबतर्फे ‘ग्रह वाचवा, सायकल चालवा’ या घोषवाक्यासह सायकलिंग मोहीमेचे आयोजन करण्याद्वारे आजचा ‘वर्ल्ड बायसिकल डे -2022’ अर्थात जागतिक सायकल दिन आरोग्यपूर्णरित्या साजरा करण्यात आला.
जागतिक सायकल दिनानिमित्त शहरातील वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे आज शुक्रवारी सकाळी 15 कि. मी. सायकलिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडी येथील आरपीडी क्रॉस येथे असलेल्या अजंठा हॉटेल येथून सकाळी 6 वाजता या सायकलिंग मोहिमेचा शुभारंभ झाला.
या मोहिमेत रोहन हरगुडे, अरुण पाटील, रतन मदाली, सचिन अष्टेकर, अजित शेरेगार, विवेक गुलाबांनी, सारिका नाईक, कौशिक पंडित, विक्रांत कलखांबकर, भाऊ नेसरकर, भास्कर परूळेकर, 65 वर्षीय रमाकांत सडेकर, अरविंद खंडागळे, विश्वनाथ कोटूर, प्रतीक वर्णेकर, चाणक्य गुंडपण्णावर, कीर्ती टेंबे, महेश जुवळी, महेश चौगुले, धीरज भाटे, राकेश, अभिनंदन हंजी, पद्मजा हंजी, उर्मी शेरेगार, निखिल हळदणकर, नितीन मिरजी, संजय देशपांडे, खंडोबा कुलकर्णी, 7 वर्षीय मल्हार कुलकर्णी आणि सतीश पाटील अशा 30 l सायकलिंगपटुंचा उत्स्फूर्त सहभाग होता.
सायकल हे एक साधे, परवडणारे आणि भरवशाचे पर्यावरण पूरक वाहन आहे. इतर वाहनांप्रमाणे सायकलमुळे पर्यावरण प्रदूषणाचा अजिबात धोका संभवत नाही. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास हातभार लावणारी सायकल शारीरिक तंदुरुस्तीसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे.
या पद्धतीने सध्याच्या जगातील वाढत्या पर्यावरण प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सायकल वापराचे महत्त्व अधोरेखित होत आहे. त्यासाठीच वेणूग्राम सायकलिंग क्लबतर्फे जागतिक सायकल दिनानिमित्त आजच्या सायकलिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. अखेर एकमेकांना शुभेच्छा देऊन चहापानाने सायकलिंग मोहिमेची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

जमिनीच्या वादातून एकमेकांवर हल्ला; दोघांचाही मृत्यू

Spread the love  बेळगाव : जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *