बेळगाव : कडोली येथे लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजासाठी स्मशानभूमीची नितांत गरज आहे. तेंव्हा तातडीने सरकारी जमिनीमधील जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करावी, या मागणीसाठी कडोली येथील लिंगायत समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
कडोली येथे सर्व्हे क्रमांक 23/2 मधील 14 एकर 2 गुंठे, 24/2 मधील 20 एकर 10 गुंठे आणि 618/2 मधील 4 एकर 21 गुंठे ही सरकारी जमीन आहे. त्यापैकी कोणत्याही जमिनीमध्ये लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कडोली गावामध्ये लिंगायत समाज हा मोठ्या संख्येने पूर्वापारपासून राहत आहे. आता ही संख्या वाढली आहे. पूर्वीपेक्षा तीन ते चार पटीने समाज वाढला असून स्मशानभूमीची नितांत गरज आहे. तेंव्हा तातडीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन तिगडी, शंकर पाटील, सुरेश गुडीमनी, सुनील पाटील, सुधीर तिगडी, प्रकाश गुडीमनी, अशोक गुडीमनी, चिदंबर पट्टणशेट्टी, राजू गुडीमनी, संजू कोरे, संजय मुडीमनी, नारायण हंपण्णावर, शांतीनाथ हळीज्वाळे, एस. व्ही. कोरे यांच्यासह लिंगायत समाजातील नागरिक उपस्थित होते.
