Saturday , July 13 2024
Breaking News

वाढीव शुल्क, डोनेशन विरोधात अभाविपची निदर्शने

Spread the love

बेळगाव : शाळा-महाविद्यालयांचे वाढलेले शैक्षणिक शुल्क, डोनेशनच्या विरोधात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेतर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. वाढीव शुल्क आणि डोनेशनला लगाम घालण्याची मागणी अभाविप कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
गुरुवारी सकाळी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात अभाविप कार्यकर्त्यांनी प्रचंड महागलेले शैक्षणिक शुल्क आणि डोनेशनच्या विरोधात भव्य आंदोलन छेडले. अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांकडून शिक्षण शुल्क आणि डोनेशनच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळण्यात येत असल्याचा आरोप करून यावर कारवाईची मागणी निदर्शकांनी केली. लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क आणि डोनेशनमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य विध्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थांत प्रवेश मिळवून शिकणे अवघड बनले आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राबणार्‍या पालकांच्या श्रमावर खासगी संस्था पाणी फेरीत आहेत असा संताप त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना अभाविप पदाधिकार्‍यांनी, यंदाच्या शैक्षणिक वर्षात खासगी पदवीपूर्व महाविद्यालयात नियमित अभ्यासक्रमासोबतच सीईटी, नीट आणि जेईईचे प्रशिक्षण देतो म्हणून इंटिग्रेटेड कोचिंगच्या नावाखाली अधिक पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोप केला. सरकारी नियमानुसार खासगी अनुदानित शिक्षणसंस्थांनी सरकारने ठरवून दिलेल्या निर्दिष्ट शुल्काव्यतिरिक्त अधिक शुल्क घेण्यास बंदी आहे. मात्र सरकारचा आदेश धाब्यावर बसवून खासगी संस्था मनमानी करीत अव्वाच्या सव्वा रक्कम उकळीत आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित या संस्थांवर अधिक रक्कम आकारू नये असा आदेश बजावला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. चन्नम्मा चौकात निदर्शने केल्यावर अभाविप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
या आंदोलनात सुरेश जंगोनी, किरण दुकानदार, रोहित उमानाबादीमठ, अनन्या सुभापुरमठ, सुप्रिया येळ्ळूर, यशस्विनी करडीगुद्दी आदींनी सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

पीओपी गणेशमूर्ती बंदीचा आदेश बेळगावात नको; गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सवानंतर पीओपीच्या गणेश मूर्त्या नद्यामध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे नद्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *