बेळगाव : निसर्गाचा चमत्कार आपल्याला नेहमी पाहायला आणि अनुभवायला मिळतो. निसर्गाचा चमत्कार थक्क करणारा असतो. आता हेच पहा ना पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या झाडाला चक्क गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल उमलले आहे. कोठे घडला आहे हा निसर्गाचा चमत्कार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पुढे वाचा…..
शहापूर आचार्य गल्लीमध्ये पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या झाडावर चक्क गुलाबी रंगाचे फूल उमलले आहे. विशेष म्हणजे पांढऱ्या आणि गुलाबी जास्वंदीचे फूल आजूबाजूला उमलले आहेत. आचार्य गल्लीतील डॉ. प्रणव अध्यापक यांच्या घरासमोरील अंगणात लावलेल्या जास्वंदीच्या झाडावर निसर्गाचा हा चमत्कार पाहायला मिळाला. सकाळी पांढरे आणि गुलाबी रंगाचे जास्वंदीची फुले उमललेली रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिले आणि ते इतरांच्या निदर्शनास आणले. तेथून जाणारे येणारे अनेकजण पांढरे आणि गुलाबी जास्वंदीचे फूल पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
