बेळगाव : बेळगावातील फोर्ट रोडवर भाजप नेत्या नुपूर शर्मा यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती वीजवाहिनीवर टांगणार्यांवर कठोर कारवाईची मागणी हमारा देश संघटनेने केली आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी अवमानकारक विधान केल्याचा आरोप करून त्यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती वीजवाहिनीवर लटकावल्याची घटना बेळगावातील फोर्ट रोडवर उघडकीस आली होती. या घटनेचा हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निषेध केला होता. या कृतीतून बेळगावातील शांतता बिघडविण्यात येत असल्याचा आरोप करून हमारा देश संघटनेने यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निदर्शने करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना संघटनेचे पदाधिकारी मल्लिकार्जुन यांनी, कोणत्या तरी विधानावरून नुपूर शर्मा यांची प्रतिकृती बेळगावात लटकवण्यात आली होती. यातून बेळगावातील शांतता बिघडविण्यात येत आहे. त्यामुळे या उपद्रवी लोकांवर कारवाईची मागणी आम्ही जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Check Also
हिवाळी अधिवेशनावर 580 सीसीटीव्ही तर 10 ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
Spread the love बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी …