बेळगाव : वटपौर्णिमेनिमित्त तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी श्री रेणुका देवी मंदिरात विशेष पूजा केली. त्यावेळी वटपौर्णिमेचा उपवास करणार्या शेकडो सुहासिनी महिलांसाठी खिचडी प्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावर्षीची वटपौर्णिमा मंगळवारी देवीच्या वारा रोजी आल्याने महिलांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. या भागांत नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू असून अनेक भाविक स्वेच्छेने आर्थिक मदत देत आहेत. यावेळी मंदिर ट्रष्टचे अध्यक्ष राहुल मुचंडी, विनोद पुजारी, यल्लाप्पा पाटील, बाळू लोहार, वसंत हलगेकर, संदीप लुगडे आदी उपस्थित होते.