Wednesday , July 24 2024
Breaking News

कागवाड मतदारसंघात तीन कोटींचे रस्ते

Spread the love

मंगसुळी-ऐनापूर, कागवाड-गणेशवाडी रस्ता कामाला प्रारंभ
अथणी : कागवाड मतदार संघातील मंगसुळी-ऐनापूर रस्त्यासाठी 2 कोटी रूपये तर कागवाड-गणेशवाडी रस्त्यासाठी 1 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. माजी मंत्री व आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून त्यांच्या हस्ते या दोन्ही रस्ताकामांना प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत हे रस्ते होणार आहेत.
मंगसुळी-ऐनापूर रस्ता उद्घाटनावेळी काही ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी होती. आ. श्रीमंत पाटील यांनी विशेष प्रयत्न करून या रस्त्यासाठी 2 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार केला. आ. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता व कंत्राटदाराला या रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली.
कागवाड-गणेशवाडीसाठी 1 कोटी
कागवाड ते गणेशवाडी रस्ता देखील मोठ्या प्रमाणात खचला होता. या रस्त्यासाठीही निधी हवा, यासाठी आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचे फलीत म्हणून या रस्त्यासाठीही 1 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या कामाला देखील आमदार व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रारंभ झाला.
या दोन्ही कार्यक्रमाला कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली, बांधकाम खात्याचे अभियांता जी. ए. हिरेमठ, आर. पी. अवताडे, एम. एस. मगदूम व या दोन्ही गावचे भाजप नेते, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जमिनीच्या वादातून एकमेकांवर हल्ला; दोघांचाही मृत्यू

Spread the love  बेळगाव : जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *