बेळगाव (प्रतिनिधी) : झी टीव्हीवर गाजत असलेल्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील अभिनेते हास्यवीर भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे हे दोघेही दि. 3 जुलै रोजी बेळगावात येत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन संस्थेच्या सांस्कृतिक विभागातर्फे त्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा राजू पवार डान्स अकॅडमी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा हा सोहळा दि. 3 जुलै रोजी येथील के. एल. ई. एस. संस्थेच्या शताब्दी सभागृहात होणार आहे. याच कार्यक्रमात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने डॉ. विजय देसाई आणि राजू पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आय. एम. ए. च्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष डॉ. बसवराज बिजर्गी आणि डॉ. राजेश लाटकर उपस्थित होते.
