बेळगाव : ‘बीएससी द टेक्स्टाईल मॉल’ या कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यामधील सर्वात मोठ्या टेक्स्टाईल शोरूमचा उद्घाटन सोहळा येत्या रविवार दि. 26 जून रोजी सकाळी 10:30 वाजता होणार असून उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन शेजारी भव्य टेक्स्टाईल शोरूम असलेला ‘बीएससी द टेक्स्टाईल मॉल’ उभारण्यात आला आहे. येत्या रविवारी आयोजित या मॉलच्या उद्घाटन समारंभास उद्घाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून केएलई सोसायटी बेळगावचे चेअरमन डॉ. प्रभाकरराव कोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहरातील चन्नबसव शोरूममध्ये आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत माॅलच्या संचालकांनी ही माहिती दिली.
बेळगावच्या लोकांना लग्नसराई सारख्या समारंभासाठी 1 लाखापेक्षा अधिक खर्चाचे कपडेलत्ते खरेदी करण्यासाठी दावणगिरीला जाणे सोयीचे ठरू शकते. मात्र पाचशे -हजाराच्या लहानसान खरेदीसाठी प्रवास खर्च लक्षात घेता कोणीही दावणगिरीला जाणे पसंत करणार नाही.
बीएससीच्या दावणगिरी येथील दुकानात येणारे ग्राहक जेंव्हा कपड्यांच्या खरेदीसाठी दावणगिरीला येण्याजाण्याचा खर्च, वेळेचा होणारा अपव्यय आणि लहानसहान खरेदीसाठी दावणगिरीतील आमच्या दुकानात येणे शक्य नसल्याचे सांगून बेळगावातही तुमची शाखा सुरू करा, अशी मागणी करू लागले होते. त्यावेळी ग्राहकांचा जर आपल्यावर इतका विश्वास असेल तर त्यांच्या सोयीसाठी बेळगावमध्ये आपली शाखा का सुरू करू नये असा विचार करून आम्ही ही शोरूम सुरू करत आहोत, असे सांगून आमच्याकडील उत्पादनांना येथील जनतेने दिलेला प्रतिसाद लक्षात घेता बेळगावातील आमचे हे शोरूम अल्पावधीत लोकप्रिय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘बीएससी’ मधील ग्राहक सेवा आणि समाधानाची परंपरा 1938 साली सुरू झाली, जेंव्हा कै. बी. एस. नंजुंडप्पा यांनी दावणगिरी येथील कालिकादेवी रोडवर एक छोटे दुकान सुरू केले. खिशाला परवडणारी दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आमच्या वचनबद्धतेमुळे आज आमच्या व्यवसायाचा दुकानांच्या साखळीच्या स्वरूपात मोठा विस्तार झाला आहे.
सर्व मोसमांमध्ये आणि हरएक समारंभासाठी ग्राहकांना उत्कृष्ट उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो. ‘बीएससी द टेक्स्टाईल मॉल’ ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रिय शोरूम आम्ही बेळगावात सुरू करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे, असे ही पत्रकार परिषदेप्रसंगी सांगण्यात आले.
Check Also
हिवाळी अधिवेशनात दिलेली कामे सर्व समित्यांनी काळजीपूर्वक पार पाडावीत : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
Spread the love बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौध येथे होणारे हिवाळी अधिवेशन अवघ्या चार दिवसांवर येऊन …