साखर, इथेनॉल उत्पादनाची माहिती घेण्यासाठी देशभरातून प्रतिनिधी रवाना
बेळगाव : ब्राझील येथील साखर व इथेनॉल उत्पादन अत्याधुनिक प्लांटचा अभ्यास करण्यासाठी युवा उद्योजक बंधू श्रीनिवास श्रीमंत पाटील व योगेश श्रीमंत पाटील हे दोघे ब्राझीलला रवाना झाले. देशभरातील अनेक साखर कारखान्यांचे प्रतिनिधींनीही यामध्ये सहभाग घेतला आहे.
ब्राझील येथील साखर कारखानदारी, तेथील इथेनॉल प्लांट, इथेनॉलचा वाहनांसाठी किती टक्के वापर, शिवाय तेथील तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भारतातून एक शिष्टमंडळ ब्राझीलला गेले आहे. यामध्ये अथणी शुगर्स लि., चे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील व कार्यकारी संचालक योगेश पाटील हे सहभागी झाले आहेत. देशभरातील विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे.
साखर कारखानदारीतील ब्राझीलचे तंत्रज्ञान भारतापेक्षा काही प्रमाणात पुढे आहे. तेेथील यंत्रसामग्री, साखर उतारा वाढीसाठी वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान याचा या शिष्टमंडळाने अभ्यास केला.
अन्य देशांमधील युएनआयसीएचे चेअरमन इव्हॅनो गुस्सी, युएनआयसीएचे संचालक, कार्यकारी अधिकारी, सल्लागार, एच. पी. कंपनीचे सुवेंद्र गुप्ता, श्रीधर व सदस्य, एसआयएम चेअरमन मिस्टर बॅनर्जी, एसआयएमएचे चेअरमन झुणझुणवाला, इंडियन एम्बेसीचे मिस्टर प्रधान यांच्यासह अन्य मान्यवर देखील सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta