बेळगाव : कंग्राळी (खु.) येथील केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचा प्रारंभ खा. मंगला अंगडी व आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यातून ग्रामस्थांना घरोघरी नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या योजनेसाठी 4 कोर्टीचा निधी मंजूर झाला आहे. प्रारंभी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील यांनी खासदार व आमदार यांचे स्वागत केले.
खा. मंगल अंगडी, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, भाजप ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम व अन्य सदस्यांनी पूजन करून कामाला प्रारंभ केला. आ. हेबाळकर यांनी काम दर्जेदार होण्यासाठी व जलवाहिनीघालताना उखडलेला रस्ता पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी नजर ठेवण्याचे सुचविले. ग्रा. पं. सदस्य वैजनाथ बेन्नाळकर, कल्लापा पाटील, लता पाटील, विनायक कम्मार, सुनिता जाधव, मिना मुतगेकर राधा कांबळे, वीणा पुजारी, मधुमती पाटील आदींसह भैय्या पाटील, मनोहर पाटील, बाळाराम पाटील, सद्दाम शेख, कल्मेश अक्कलकोटी, विष्णू दरवंदर, जोतिबा थोरवत, अशोक थोरात, मनोहर बुक्याळकर उपस्थित होते. पीडीओ बर्गी यांनी आभार मानले.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …