बेळगाव : सावरकर-बंधूंची अंदमानातून सुटका झाल्याच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सावरकर अभिवादन यात्रेच्या बेळगावसह मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या सदस्यांनी अंदमान येथील अनेक वर्षे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र-मंडळाला भेट दिली. दि.24.9.21 रोजी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध किर्तनकार श्री.चारुदत्त आफळेजींनी मराठी अभंग सादर करीत सागरा प्राण तळमळला गीतानी सांगता केली. बुकलव्हर्स क्लबचे सचिव किशोर काकडेंनी चॉकलेट, छोटीशी देणगी, विवेकानंद शिलास्मारक पुस्तिका, राष्ट्रीय दिनदर्शिका अशा वस्तू मंडळाचे सचिव अरविंद पाटीलना सुपुर्द करीत मराठी अभिमान गीत सादर केले. मंडळाच्या सदस्यांनीही यावेळी मनोरंजन केले. महाराष्ट्र मंडळाच्या स्वतःच्या चार मजली वास्तुत स्वा. सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी अशी दोन सभागृहे आहेत हीही कौतुकास्पद गोष्ट तर विविध बेटांवरील अनेक मराठी परीवार या मंडळाचे सदस्य असल्याचे सांगण्यात आले. हे मंडळ खुप कृतीशील आहे. शासनाचीही मदत असल्याचे नमूद करण्यात आले. अंदमान सारख्या सुदूर बेटांवर जिथे प्रामुख्याने बांगला-तमिळ-हिंदी भाषा बोलल्या जातात तिथे माय-मराठी अनुभवतांना अभिमान वाटतो. इतरही भारतीय भाषा आहेतच मुळे हा एक छोटा-हिंदुस्थानच होय. या यात्रेत बेळगावातून सरस्वती वाचनालयाचे कार्यकर्ते सुहास सांगलीकर व परिवार, बुकलव्हर्स क्लबचे निखील नरगुंदकर व किशोर काकडेही सहभागी होते.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …