Tuesday , December 9 2025
Breaking News

शीतल हॉटेल जवळील थळ देवस्थान येथे कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी

Spread the love

 

बेळगाव : खडे बाजार शीतल हॉटेल जवळील बेळगावमधील थळ देवस्थान (मुख्य देवस्थान) सुमारे 90 वर्षे पुरातन मंदिर आहे. या देवस्थानच्या परिसरात कचरा टाकून जमा करण्यात येतो. हा कचरा भरपूर प्रमाणात टाकण्यात येत असल्याने खूप दुर्गंधी पसरली असून किड्यांचा, उंदीर, घुस, गोगलगाय किडे लागून देवस्थानाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पूजा अर्चा विधि व देवळास प्रदक्षिणा घालण्यास कठीण होत आहे. याविषयी माननीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका बेळगाव यांना दिनांक 10/03/2021 रोजी थळ देवस्थान परिसरात होणार्‍या कचर्‍याबाबत योग्य कारवाई करावी, अशी मागणी अर्ज देऊन विनंती केली होती तरी याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आता येणार्‍या दसरा दिवाळी सणानिमित्त भक्तजन देवस्थानात येतात. त्यावेळेस पूजा विधी करण्यात येत असतो. या अशा दुर्गंधी परिस्थितीत पूजा विधी कशी करावी हा प्रश्न पडला आहे. यासाठी लवकरात लवकर योग्य कारवाई करून येथे कचरा टाकणे कायमस्वरूपी बंद करावा, अशी कळकळीची मागणी येथील व्यापार्‍यांनी व नागरिकांनी केली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी प्रवीण कनेरी, दीपक खटावकर, अजित कोकणे, विकास कलघटगी, हेमंत हावळ, महेश खटावकर, नितीन चिकोर्डे, मनोज पतंगे, सुरेश पिसे, अमर कोपर्डे, निरंजन बोगांळे, सुनील कनेरी, अशोक रेळेकर, प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *