Saturday , June 6 2026
Breaking News

श्रीकांत शिंदेंचे ‘त्या’ व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण

Spread the love

 

मुंबई : आज सकाळपासून एका फोटोवरून राजकीय वर्तुळात नवी चर्चा पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. मागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असा बोर्ड असताना पुढे खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे हाकतात का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी त्या फोटोसंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
ते म्हणाले, खुर्चीमागे तो बोर्ड होता, याची आपल्याला कल्पनाही नव्हती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एक व्हीसी आहे. त्यासाठी ती व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठीच एखाद्या अधिकार्‍याने मागच्या बाजूला बोर्ड आणून ठेवला असेल. पण तो बोर्ड तिथे असेल, याची मला कल्पनाही नव्हती. हे आमचं घर आहे. या घरातून समस्या सोडवण्याचं काम वर्षानुवर्ष होतंय. ही व्यवस्था तात्पुरती करण्यात आली होती, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ती माझीच खुर्ची आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून लोक आम्हाला इथेच भेटायला येतात. मी किंवा एकनाथ शिंदे, आम्ही दोघं या ऑफिसचा वापर करतो. हे घर शासकीय घर नाही. मी वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो असे नाही. पण यातून बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *