
बेळगाव : हिंडलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीत संपन्न झाली. संस्थेचे हे 77 वे वर्ष होय. ही सभा सिद्धी विनायक सभागृहात संघाचे चेअरमन रमाकांत पावशे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
प्रथम सभासद व निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी प्रास्ताविक मनोगत केले. व्यवस्थापक उत्तम शिंदे यांनी पुष्पमाला घालून सर्वांचे स्वागत केले. व्हा. चेअरमन जयश्री पावशे यांच्या हस्ते लक्ष्मी प्रतिमा पूजन करुन चेअरमन रमाकांत पावशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. शाहीर व्यंकटेश देवगेकर यांच्या स्वागतगीतानंतर उत्तम शिंदे यांनी ताळेबंद अहवाल वाचन करून संघासाठी बांधण्यात येत असलेल्या गोडाऊनच्या प्रगतीची माहिती दिली. संघाला रु. चार लाख निव्वळ नफा झाला असून पाच टक्के लाभांश जाहीर केला. संचालक अशोक वाय. पाटील, भागाण्णा नरोटे, सुरेश अगसगेकर, विलास नाईक, महादेव राक्षे, पापुल किल्लेदार, धर्मेंद्र खातेदार, मोहन नाईक, पार्वती कोकितकर
सल्लागार अशोक पाटील, विनायक पावशे, बाळू तरळे, यल्लाप्पा कलखांबकर, रमेश कडोलकर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ सभासद सिद्राय काकतकर, भरमा चौगुले, मारुती पाटील, बाबू कडोलकर यांचा सत्कार करण्यात आला. उदय नाईक यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती केली.
व्हा. चेअरमन जयश्री पावशे, अशोक वाय. पाटील यांची शुभेच्छा देणारी भाषणे झाली. अध्यक्षीय भाषण रमाकांत पावशे यानी केले. शेवटी आभार उत्तम शिंदे यांनी केले. शेवटी
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हिंडलगा, सुळगा, मण्णूर, आंबेवाडी येथील सभासद, ठेवीदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta