Thursday , June 4 2026
Breaking News

श्री लक्ष्मी- नरसिंह -मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात

Spread the love

 

सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा गावाचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी- नरसिंह असून या मंदिरात वर्षातून दोन वेळा नवरात्रोत्सव होत असतो. पहिला श्री नरसिंह जयंतीच्या अगोदर नऊ दिवस व दुसरा शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापने पासून सुरू होतो. या दोन्ही नवरात्रोत्सवास भाविक मोठ्या भक्ती भावाने उपवासास बसतात. घटस्थापनेपासून या उपवासास सुरुवात होते.
घटस्थापने दिवशी सकाळी श्री नरसिंह देवास अभिषेक घालून पूजा करण्यात आली. यानंतर विक्रम पाटील यांनी घटस्थापना केली याचे पौरोहित्य श्रीरंग जोशी यांनी केले. यावेळी मंदिराचे पुजारी नरसिंगा गुरव, श्रीकांत सित्रे, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. यानंतर आरती होऊन नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. या नवरात्रीमध्ये दररोज सकाळ- संध्याकाळ आरती करण्यात येते. या आरतीच्यावेळी नवरात्रीस बसलेले भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या नवरात्रीच्या उपवासास दीडशे भाविक- भक्त बसले आहेत. मंदिरामध्ये व शिखरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या नवरात्रीच्या उपवासास सचिन पाटील, सुनील पाटील, सुरेश पाटील, नंदकुमार पाटील, सुधाकर पाटील, अवधूत मोरे, अशोक पाटील, यांच्यासह अनेक भाविक भक्त उपवासास बसले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत इंटरनेट सेवेची गती मंदावल्याने आधार कार्डासह उतारे मिळविण्यासाठी धावपळ

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद पडल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *