Thursday , June 4 2026
Breaking News

नॅनो कार उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

Spread the love

 

बेळगाव : पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हलग्यानजीकच्या सर्विस रोडवर नॅनो कार उलटली. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही कार बेळगावहून हुबळीच्या दिशेने जात असताना हलग्यानजीकच्या सर्विस रोडवर असणाऱ्या राईस मिलजवळ ही घटना घडली.

या कारमधून आजी – आजोबा प्रवास करीत होते. मात्र सुदैवाने किरकोळ दुखापती व्यतिरिक्त त्यांना अन्य कोणतीही दुखापत झाली नाही.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कारमधून प्रवास करणारे आजी – आजोबा बेळगावमध्ये बाजार करून कारने हुबळीला निघाले असताना हा अपघात झाला.

कार उलटताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन कार मधील वयोवृद्ध आजी-आजोबांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर शासकीय 108 रुग्णवाहिकेला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने किरकोळ दुखापती व्यतिरिक्त काहीच न घटल्याने मदतीस धावलेल्यानी नि:श्वास सोडला.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *