
बेळगाव : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर व बेळगाव ग्रामीण आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पक्ष नेत्या सोनिया गांधी आणि युवा नेते राहुल गांधी यांच्या समवेत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
या पदयात्रेत खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही सहभाग घेतला. सीमावर्ती खानापूर मतदारसंघात पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचा झेंडा फडकवून इतिहास घडवणार्या डॉ.अंजली निंबाळकर या पहिल्या महिला आमदार आहेत. त्यामुळे त्या पदयात्रेत सहभागी होत असताना सोनिया गांधी यांनी त्यांचा हात हातात घेतला आणि काही पावले टाकली. त्यामुळे खानापूरमधील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.
आ. हेब्बाळकर यांच्याकडून सोनिया गांधींचे स्वागत
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे स्वागत केले. केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेसने देशभरात ‘भारत जोडो’ यात्रा काढली आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पक्षनेते राहुल गांधी, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्यासह कर्नाटक काँग्रेसचे आघाडीचे नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत. ही यात्रा मंड्या जिल्ह्यात पोहोचली. यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta