Monday , September 21 2026
Breaking News

अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ

Spread the love

 

कॅलिफॉर्निया : भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियातील एका फळबागेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आठ महिन्यांच्या मुलीचा देखील समावेश आहे. हे कुटुंब काही दिवसांपासून बेपत्ता होते, अशी माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. आठ महिन्यांच्या आरोही धेरीसह तिची आई 27 वर्षीय जसलीन कौर आणि वडील जसदीप सिंग यांचे उत्तर कॅलिफोर्नियातील मर्सेड काऊंटीच्या एका ट्रकिंग कंपनीमधून सोमवारी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर बाळाचे काका 39 वर्षीय अमनदीप सिंग यांचेही अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मर्सेड काऊंटी पोलिसांनी दिली आहे.
या चौघांचे मृतदेह इंडियाना आणि हुतचींन्सन रस्त्यावरील एका फळबागेत बुधवारी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फळबागेतील एका शेतमजुराला हे मृतदेह आढळून आले होते. या घटनेमुळे येत असलेला राग शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शेरिफ वान्र्के या पोलीस अधिकार्‍याने दिली आहे. या कुटुंबाचे अपहरण करतानाचा व्हिडीओ पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत जसदीप आणि अमनदीप हाताला बांधलेल्या अवस्थेत ट्रकिंग कंपनीतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळातच बाळासह जसलीन कौर इमारतीतून अपहरकर्त्यांसोबत बाहेर जाताना दिसत आहेत. या चौघांचे एका ट्रकमधून अपहरण करण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *