Monday , September 21 2026
Breaking News

थायलंडच्या बाल संगोपन केंद्रात गोळीबार; 22 मुलांसह 34 जण ठार

Spread the love

 

थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतात बालसंगोपन केंद्रात माजी पोलिस कर्मचार्‍याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 चिमुरड्यांसह 34 जणांचा करुण अंत झाला. पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. पोलिस कर्मचार्‍याने रक्तपात केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडल्याने त्याचाही मृत्यू झाला. पोलिस उपप्रवक्ते अर्कोन क्रेटोंग यांनी रॉयटर्सला माहिती देताना सांगितले की, या घटनेत तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॉन्ग बुआ-लुम्फू येथील बालसंगोपन केंद्रात एका बंदुकधारीनं घुसून गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबार करणारा घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बंदूकधारी माजी पोलीस अधिकारी होता आणि त्याचा शोध सुरू होता. थायलंडमध्ये बंदुकधार्‍यांचा दर प्रदेशातील काही इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. परंतु, अधिकृत आकडेवारीमध्ये मोठ्या संख्येने बेकायदेशीर शस्त्रे समाविष्ट नाहीत. ज्यापैकी बर्‍याच वर्षांमध्ये संघर्षग्रस्त शेजार्‍यांकडून सीमा ओलांडून आणल्या गेल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *