बेळगाव : ज्येष्ठ कन्नड पत्रकार, शेतकरी नेते कल्याणराव मुचलंबी रा. शेट्टी गल्ली बेळगाव यांचे बुधवारी निधन झाले आहे. निधनासमयी ते 72 वर्षाचे होते. गोकाक येथील इस्पितळात त्यांचे निधन झाले.
बेळगाव ते गोकाकमधील सावळगी गावाला जाणार्या पदयात्रेत ते सहभागी झाले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने गोकाकमधील खाजगी इस्पितळात दाखल करताना वाटेतच त्यांचे निधन झाले. हसिरू क्रांती कन्नड दैनिकाचे ते संपादक होते. गुरुवारी सकाळी 9 वाजता सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.
