बेळगाव : आज गुरुवारी महालक्ष्मी सोसायटी व श्रीराम कॉलनी, आदर्श नगर परिसरात विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून सदर परिसरात विविधकामांना मंजुरी मिळाली आहे.
गोपाल मिरजकर, विनय बेहरे, प्रदीप जोशी, डॉ. मृगेन्द पट्टणशेटी व इतर उपस्थित मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आम. अभय पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक मंगेश पवार यांनी आगामी सहा महिन्यांत परिसरातील रस्ते, गटर, ड्रेनज आदी कामे पूर्ण केले जातील. 24 तास पाणी, गॅस लाईन, भुयारी विज लाईन कामांचे सर्वेक्षण सुरु आहे. सदर कामे ही लवकरात लवकर सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न केले जातील. महालक्ष्मी सोसायटी व श्रीराम कॉलनी परिसरात ओपन जिम, योगा सेंटर, कम्युनिटी सेंटर, बगीचा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासनही आमदार अभय पाटील यांनी दिले आहे.
Check Also
स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण
Spread the love बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …